महत्वाच्या बातम्या

 मुरखळा येथे ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / मुरखळा : ज्या दिवशी खेडेगावातील महिला शेकोटी भोवती बसुन घरगुती गप्पा ऐवजी देशाच्या शैक्षणिक व आर्थीक विषयावर चर्चा करतील, त्या दिवसापासुन देशाची वाटचाल प्रगतीच्या योग्य दिशेने चालु आहे समजले जाईल, तसेच प्रत्येक जातीतील व्यक्ती ज्याला आपल समजतात ते कार्यकर्ते स्व-स्वार्थ साधुन नेत्यांचे गुलाम होऊन समाजाला विकतात असे सामाजीक प्रबोधनकार बळीराज निकोडे यांनी 3 जानेवारी 2023 रोजी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनी मुरखळा येथे आयोजीत कार्यक्रमात रोखठोक मत व्यक्त केले. तर अल्काताई गुरनुले यांनी अंधश्रध्दा कशी कशी पसरत जाते, त्याच्या आडुन होणारे आर्थीक शोषण इ. बाबत मार्गदर्शन केले.

शाळकरी मुले, सुरेख वेशभुषा केलेल्या महिला यामुळे काढण्यात आलेल्या मिरवणुकीला चांगली शोभा आली. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन जनसमुदायाच्या उपस्थितीत सावित्रीमाईंना विनम्र अभिवादन करण्यात आले. अनेक लहान मुलींनी सावित्रीमाईं सारखी वेशभुषा केलेली होती. तसेच स्वरा मोहुर्ले या चिमुकलीने भीमाची लेक गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले. निमंत्रीत पाहुणे व समस्त गावक-यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटक चांदेकर सरपंच मुरखळा, अध्यक्ष चंद्रकला मांदाळे माजी पं. स. सदस्या, तसेच मंदा गावतुरे मुरखळा महिला अध्यक्षा, आदिवासी नेते गोवर्धन आत्राम, जनार्दन सेवा संस्थेचे खर्डीवार, पो.पा. गावतुरे, उमाजी कोरडे, गुलशन बांबोळे, गजपल्लीवार, माया मोहुर्ले, बेबीताई सोनुले, इ. पाहुणे, कार्यकर्ते, हजर होते. प्रास्ताविक गणेश लोनारकर, संचालन महेंद्र मोहुर्ले व आभार शुभांगी सोनुले यांनी व्यक्त केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos