महत्वाच्या बातम्या

 वाहतूक सिग्नल लावण्याबाबत पोलीस प्रशासनाचा वरोरा नगरपालिकेला सूचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : नागपूर -चंद्रपूर महामार्गावर वरोरा हद्दीत आनंदवन चौक व अब्दुल कलाम रत्नमालाचौकात वाहतूक सिग्नल लावण्याबाबतच्या स्पष्ट सूचना पोलीस विभागाने वरोरा नगरपालिकेला दिल्या आहे.

नागपूर चंद्रपूर महामार्गावर आनंदवन चौक, अब्दुल कलाम रत्नमालाचौक व बोर्डा चौक हे वरोरा शहराच्या हद्दीतून जात असून या तिन्ही चौकात चौफुला असून वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत असून वाहनांच्या अपघाताने अनेकांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहे. माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी याबाबत वरोरा नगरपरिषद, उपविभागीय अधिकारी व चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले होते. 

सदर निवेदनावर वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अहवाल मागितला असून वरोरा पोलिसांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना या चौकात वाहतूक सिग्नल लावण्याबाबतचे पत्र देऊन सूचना केली आहे. माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी याबाबत पाठपुरावा करत मुख्याधिकारी गजानन भोयर यांची आज भेट घेतली. वाहतूक सिग्नलबाबत प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करण्यात येत असल्याचे, मुख्याधिकारी भोयर यांनी सांगितले. वाढती वाहतूक व अपघाताचे सत्र बघता आनंदवन चौक, कलाम चौक व बोर्डा चौकात लवकरात लवकर वाहतूक सिग्नल लावण्याची मागणी माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos