महत्वाच्या बातम्या

 नागपूर जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिसांचा मोठा छापा, ३ कनिष्ठ लिपिकांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन कनिष्ठ लिपिकांना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींवर ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा दुरुपयोग करून बनावट नोकऱ्या तयार करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान असे समोर आले की, तीन कनिष्ठ लिपिकांनी शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांसोबत संगनमत करून बनावट शालार्थ आयडी तयार केले आणि त्यावर नोकरी मिळवून वेतन घेत शासनाची फसवणूक केली.

पोलिसांनी अटक केलेले आरोपी -

१. जगदीश दिनकरराव ढेंगे (३५, चरणदास प्रायमरी शाळा, मानेवाडा)
२. यशवंत धकाते (३५, जगन्नाथ पब्लिक स्कूल, भांडेवाडी)
३. अक्षय संजय मांडे (३१, विद्या विकास उच्च प्राथमिक शाळा, वाठोडा ले आऊट)

या घोटाळ्यातील अटकेतील आरोपींची संख्या एकूण २४ झाली आहे. यामध्ये तीन शिक्षण उपसंचालक, तीन शिक्षणाधिकारी, एक वेतन अधीक्षक, तीन मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक, तीन सहायक शिक्षक, सहा लिपीक आणि तीन कनिष्ठ लिपिकांचा समावेश आहे. पोलिसांची तपास कार्यवाही पुढे चालू असून, अधिक अटक होण्याची शक्यता आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos