पारवा पोलीस स्टेशनसह यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या


विदर्भ न्युज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी : पारवा पोलीस स्टेशनसह यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात बदल्या व नेमणुका करण्यात आल्या आहे.
पारवा पोलीस स्टेशन येथे बाभुळगांव वरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत श्रीराम चौधरी हे ठाणेदार म्हणून रुजू झाले आहे. तर पारवा येथील ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बापुराव नरसाळे यांची पांढरकवडा पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय बदलीचे आदेश यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी काढले आहे.
पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज वसंतराव दाभाडे यांची बदली दिग्रस पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. पुसद येथील वाहतूक नियंत्रण उप शाखेचे प्रभारी अधिकारी निलेश श्रीरंग शेंबडे यांची पोफाळी ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली आहे. उमरखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चंद्रशेखर चौधरी यांची पुसद वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल विठ्ठल गुंडे यांची दिग्रस वरुन वाहतूक उप शाखा उमरखेड येथे करण्यात आली आहे. उमरखेड येथील वाहतूक नियंत्रण उपशाखेचे प्रभारी रोहीत गंगाधर बेंबरे यांची बाभुळगांव ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली आहे. दराटीचे ठाणेदार योगेश रामचंद्र वाघमारे यांची दिग्रस पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. दिग्रस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसेनजित चंद्रकांत जाधव यांची बदली ठाणेदार दराटी म्हणून बदली करण्यात आली आहे. शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधव गुणाजी शिंदे यांची बदली पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे वाचक फौजदार म्हणून बदली करण्यात आली आहे. यवतमाळ येथील पोलीस अधीक्षक यांचे वाचक फौजदार मनिष सुभाषराव गावंडे यांची बदली स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथे करण्यात आली आहे. पोलीस नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अशोकराव गोपीनवार यांची उमरखेड पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आहे.
News - Rajy




Petrol Price




