राज्यात ग्राहक आयोगात २३६ पदे रिक्त, तक्रारींचे निवारण ठप्प


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : राज्यातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांमध्ये एकूण २३६ पदे रिक्त असून, आयोगाचे दैनंदिन कामकाज गंभीरपणे प्रभावित झाले आहे. कमी मनुष्यबळामुळे तक्रारी वेळेत निकाली निघत नाहीत आणि ग्राहकांना न्याय मिळण्यात विलंब होत आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले असून रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. ग्राहकांच्या अधिकारांचे संरक्षण करणारा कायदा असून, त्यानुसार ग्राहक तक्रारी ९० दिवसांत निकाली निघणे बंधनकारक असते; मात्र, कमी कर्मचाऱ्यांमुळे अनेक तक्रारी वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात.
अध्यक्ष व सदस्यांची स्थिती -
राज्यातील ४१ जिल्हा आयोगांपैकी फक्त २९ आयोगांमध्ये अध्यक्ष कार्यरत आहेत, तर १२ आयोगांमध्ये अध्यक्ष पद रिक्त आहे. सदस्यांपैकी २४ पदे रिक्त असून, सध्या फक्त ५८ सदस्य कार्यरत आहेत. रिक्त पदांमुळे १० ग्राहक आयोगांचे कामकाज बंद पडले आहे.
इतर कर्मचाऱ्यांची रिक्तता -
पद मंजूर रिक्त
व्यवस्थापक ४१ २४
लेखाधिकारी ४ १६
लघु लेखक ८७ ३६
शिरस्तेदार ५३ २३
सहा. अधीक्षक ४३ २७
लेखापाल ४४ १५
लिपिक ० ५९
एकूण ४०२ २००
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने नमूद केले आहे की, आयोगातील रिक्त पदे तातडीने भरली गेली नाहीत तर ग्राहक तक्रारींचे निकालीकरण प्रभावीपणे करता येणे कठीण ठरेल.
News - Nagpur




Petrol Price




