पवईतील ओलीसधारणेच्या घटनेवर आस्ताद काळेची संशयास्पद प्रतिक्रिया : नेटकऱ्यांची तीव्र प्रतिक्रिया


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : ३० ऑक्टोबर रोजी पवईतील आरए स्टुडिओमध्ये एक धक्कादायक घटना घडली, ज्यात रोहित आर्या या व्यक्तीने २० मुलांना ओलीस ठेवले. त्याने सरकारशी बोलायचं असल्याची मागणी केली होती, आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याला ताब्यात घेतले, परंतु काही तासांनी त्याच्या मृत्यूची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याला एन्काऊंटरमध्ये ठार केल्याचे समजले.
मिनिटा मिनिटाला घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली. सुदैवाने, सर्व मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली. परंतु या घटनेनंतर अनेक प्रतिक्रिया समोर आली आहेत. त्यातच मराठी अभिनेता आस्ताद काळे यांनी एक पोस्ट शेअर करून संशय व्यक्त केला आहे.
आस्ताद काळेचा संशय -
आस्ताद काळेने रोहित आर्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिले, कोणालाही असं ओलीस धरणं हे चुकीचं आहे. हा शेवटचा मार्ग आपलं म्हणणं ऐकलं जावं म्हणून अवलंबावा लागणं हे दुर्दैवी आहे. आणि पायात/दंडात गोळी घालून त्याला ताब्यात न घेता Vital Organs ना निषाणा बनवणं हे संशयास्पद आहे. एवढंच! बाकी जय हिंद जय महाराष्ट्र
त्यानंतर आस्ताद यांनी एक तात्काळ टीप दिली, हे असेच आपले आवाजही बंद करायला येतील. बागुलबुवा खरा ठरेल. यावर अनेकांनी त्याच्या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया -
आस्तादच्या पोस्टला नेटकऱ्यांनी विरोध केला आहे. एक नेटकरी म्हणाला, जर त्या मुलांमध्ये तुझं मूल असतं तर आज हेच म्हणाला असतास का? तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, त्याने चुकीचा मार्ग अवलंबला होता, पोलिसांनी योग्यच केलं. काही लोकांनी आस्तादच्या विचारांचीही निंदा केली आहे आणि कदाचित राजकारण्यांनी त्याला फसवलं असण्याचा उल्लेख केला आहे.
News - Rajy




Petrol Price




