टीआरपी घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ ला घेतले ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईत टीआरपी घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे सीईओ विकास खानचंदानी याला अटक करण्यात आली आहे.
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी आतापर्यत १३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ विकास खानचंदानीला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे, विकास खानचंदानी यांची या आधीही चौकशी सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी आज विकासला मुंबई पोलिसांनी अटक केली.
काही दिवसांपूर्वीच अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिकेतून केली होती. त्याचबरोबर या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करावी, अशीही मागणीही गोस्वामी यांनी केली होती. त्यावर ७ डिसेंबर रोजी या याचिकेवर न्यायमूर्ती जस्टीस चंद्रचुड यांच्यासमोर सुनावणी झाली.
News - Rajy | Posted : 2020-12-13