ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला : पुढच्या महिन्यात होणार मतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
महाराष्ट्रात गावा-खेड्यापासून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात होणार आहे. राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे.
23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल व 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
15 डिसेंबर रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील, 23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी असणार आहे. ३१  डिसेंबरला अर्जाची छाननी केली जाईल चार जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह तसंच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 4 जानेवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येईल आणि 15 जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल. 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-12-11


Related Photos