सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला : दोन जवान शहीद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
देशात एकीकडे संविधान दिन साजरा केला जात आहे. मुंबईतील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला १२ वर्ष पूर्ण होत असतानाच श्रीनगरमधून मोठी बातमी येत आहे. श्रीनगर परिसरात दहशतवाद्यांनी पुन्हा भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.
श्रीनगरमधील HMT परिसरात सुरक्षा दलाच्या टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या परिसरात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन जारी असून परिसरात ज्यादा कुमक तैनात करण्यात आली आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.
बारा वर्षांपूर्वी याच दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलवर भ्याड हल्ला केला होता आणि आज श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. काही दिवसांपूर्वी जम्मूतील नगरोटा भागातील टोल नाक्याजवळ 4 जैश एच्या दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात आला होते. हे दहशतवादी 26/11 दिवशी मोठा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर त्यांचा खात्मा करण्यात आला होता.
  Print


News - World | Posted : 2020-11-26


Related Photos