देशावर पुन्हा नवे संकट : पुढील चोवीस तासांत भयावह रुप धारण करणार निवार चक्रीवादळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशात  कोरोना व्हायरसचे संकट शमत नाही, तोच आणखीही काही संकटं डोके वर काढत आहेत. त्यातच आता चक्रीवादळाची भर पडली आहे. 
 तामिळनाडूमध्ये निवार या चक्रीवादळासंदर्भात सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी सर्व किनारी भागांमध्ये एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली असून हवामान खात्याच्या माहितीनुसार निवार चक्रीवादळ बुधवारी कराईकल आणि मल्लापुरम या भागांवर धडकू शकते . ज्या पार्श्वभूमीवर ताशी 100 ते 110 किमी वेगाने  वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 
संबंधित भागांमध्ये तैनात असणाऱ्या पथकांनी सर्व जबाबदारीची पावले  उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये चेन्नईच्या किनारपट्टी भागात अनेक चक्रीवादले धडकली आहेत. त्यामुले त्याच धर्तीवर येणाऱ्या  निवार चक्रीवादळ साठीही आपण सर्वतोपरी तयारी करत असल्याचेही ते म्हणाले. 
बंगालच्या खाडी क्षेत्रावर तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर हे  निवार चक्रीवादळामध्ये परिवर्तित झालेले आहे. इतकेच नव्हे, तर आता ते भयावह स्वरुपही धारण करु शकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार हे वादळ बुधवारी तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या किनाऱ्यांवर धडकणार आहे. परिणामी पुढील चोवीस तासांचा कालावधी हा अधिक सावधगिरीचा असेल. 
बंगालच्या खाडी भागात तयार झालेले हे वादळ तामिळनाडूच्या दिशेनं येत असून, सध्या ते पुदुच्चेरीपासून 410 किमी दक्षिणेकडे आहे. 
  Print


News - World | Posted : 2020-11-24


Related Photos