सीबीएसई बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या परीक्षांच्या चर्चांना पूर्णविराम : वेळापत्रक लवकरच जाहीर होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : देशात कोरोना व्हायरस या महामारीचा मोठा फटका विद्यार्थ्यांच्या परीक्षांना बसत आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येमुळे १० वी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द होणार असल्याच्या चर्चा सर्वदूर पसरत होत्या. आता मात्र CBSE ने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. CBSE चे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी परीक्षांबद्दल वक्तव्य केलं आहे. २०२१ या वर्षातील १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परीक्षांचे वेळापत्रक cbse.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
'बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत. लवकरच परीक्षांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षांसंबंधी CBSE अंतिम निर्णय घेणार असून वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ' त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
बोर्ड सचिव अनुराग त्रिपाठी हे ASSOCHAM द्वारा आयोजित नवीन शिक्षण धोरण वेबिनारमध्ये बोलत होते. या महामारीच्या काळात शिक्षण व्यवस्थेचे मोठे सकंट डोक्यावर होत. मात्र ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे यामध्ये खंड पडला नसल्याचे देखील ते म्हणाले.
News - Rajy | Posted : 2020-11-22