गडचिरोली पोलिस विभागाच्या माध्यमातून ३९ बेरोजगार तरूणांची सुरक्षा रक्षक म्हणून निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनीधी / गडचिरोली :
जिल्हयातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील तरूण तरूणींना अनेक समस्यांना तोंड देत, आपले जिवन व्यथीत करावे लागत असते. नक्षवाद्यांचा विकास कामांना होत असलेल्या विरोध त्यामुळे सर्वसामान्य तरूण तरूणींना शिक्षण घेणे, शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळण्याकरिता खुप अडचणींचा सामना करावा लागत असतो. या समस्यांना विचारात घेवून गडचिरोली पोलिस दल युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर आहे.
पोलिस अधिक्ष कार्यालय, नागरी कृती शाखेअंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते, या रोजगार मेळाव्या अंतर्गत हैद्राबाद येथील एएआयएमएम प्रोटेक्शन सर्विसेस हैद्राबाद या कंपनी या ठिकाणी पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलिस अधिक्षक समीर शेख, अपर पोलिस अधिक्षक समया मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत रामेश्वर स्वामी, यांच्या नेतृत्वाखाली उपविभाग सिरोंचा हद्दीतील ३९  बेरोजगार तरूणांना सुरक्षा रक्षक या पदावर निवड करून देण्यात आले.
यावेळी उपस्थित निवड झालेल्या तरूणांनी गडचिरोली पोलिस दलाच्या रोजगार मेळावा या उपक्रमाला शुभेच्छा देत पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांचे आभार मानत या नंतर देखील अशाच प्रकारच्या रोजगाराची अपेक्षा गडचिरोली पोलिस दलाकडून करण्यात यावी व दुर्गम अतिदुर्गम भागातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असे मत व्यक्त केले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-11-21


Related Photos