प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर एनसीबीचा छापा : अंमली पदार्थ जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई  :
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. दरम्यान आताच्या लेटेस्ट अपडेटनुसार एनसीबीने (Narcotics Control Bureau) प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह  आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरावर ड्रग प्रकरणात छापेमारी केली आहे. या छापेमारीतून नार्कोटिक्स कंंट्रोल ब्युरोने काही प्रमाणात ड्रग्ज देखील जप्त केले आहेत.
मुंबईतील अंधेरी परिसरात एनसीबीने ही छापेमारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या छापेमारीच्या ठिकाणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती दोघेही उपस्थित होते. या दोघांवरही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एनसीबीला या दाम्पत्याच्या ड्रग सेवनाबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार या छापेमारीत काही प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
टेलिव्हिजनच्या माध्यमातून भारती सिंह हा घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. अशावेळी तिच्या घरावर ड्रग प्रकरणात झालेली छापेमारी तिच्या चाहत्यांसाठी आणि टेलिव्हिजन विश्वासाठी खळबळजनक आहे.
काही दिवसांपूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणात अर्जुन रामपालआणि त्याची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांची देखील चौकशी केली होती. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान या बड्या अभिनेत्रींचीही एनसीबीने आतापर्यंत चोकशी केली आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-11-21


Related Photos