महत्वाच्या बातम्या

 पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी उरले फक्त २ दिवस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात काही दिवसांआधी अनेक वर्ष रखडून असलेली पोलीस भरती जाहीर करण्यात आली. राज्य सरकारकडून पोलीस भरती साठी तब्बल १८,००० जागांसाठी भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. ९ नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये सुमारे १८ लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका पोस्टसाठी तब्ब्ल हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

पोलीस भरतीची शारीरिक चाचणी येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. ०२ जानेवारी २०२३ पासून शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहे. पण त्या आधी या चाचणीसाठीचे हॉल तिकीट नक्की कसे डाउनलोड करावे, तसेच कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे जाणून घेऊया. अशी असेल शारीरिक चाचणी पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे.

यामध्ये पुरुष उमेदवारासाठी १६०० मीटर धावणे (२० गुण), १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५  गुण) असे एकूण ५० गुण तर महिला उमेदवार ८०० मीटर धावणे (२० गुण). १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी ५ कि.मी. धावणे (५० गुण), १०० मीटर धावणे (२५  गुण), गोळाफेक (२५ गुण) असे एकूण १०० गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.





  Print






News - Rajy




Related Photos