महत्वाच्या बातम्या

 अहेरी नगरपंचायत येथील सफाई कामगारांना २ महिन्यांचे थकीत वेतन द्या : अन्यथा कामबंद आंदोलन करू


- मुख्याधिकारी सूरज जाधव यांना नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी निवेदन देवून केली मागणी.

- अहेरी शहरातील विविध समस्यांवर तब्बल १ तास केली चर्चा.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ५५ सफाई कामगार कंत्राटी तत्त्वावर काम करतात. परंतु गेल्या २ महिन्यापासुन त्यांचे वेतन कंत्राटदाराने न दिल्याने त्यांच्यावर सद्या उपासमारीची वेळ आली आहे, ह्याबाबत त्यांनी भाजपाचे नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांना माहिती देत २ महिन्याचे वेतन त्वरित मिळवून देण्याची मागणी केले.

ह्या विषयांची त्वरित दखल घेत काल भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी अहेरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सूरज जाधव यांना एक निवेदन देत सफाई कामगारांना २ महिन्याचे थकीत वेतन त्वरित मिळवून देण्याची मागणी त्यांच्याकडे केले. तसेच येत्या ५ जानेवारी पर्यंत थकित वेतन न दिल्यास सफाई कामगारांना सोबत घेवुन बेमुदत कामबंद आंदोलन करू, असा इशाराही ह्या निवेदनातुन दिले आहे, नियमानुसार सफाई कामगारांना दर महिन्याच्या ३० तारखेला वेतन देणे. अनिवार्य असतांना कंत्राटदार नियमित वेतन देत नाही, त्यामुळे कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी ही ह्यावेळी केले.

अहेरी येथील कचरा व्यवस्थापनातील जनतेच्या आणि नगरसेवकांच्या शेकडो तक्रारी सह शहरातील विविध समस्यांवर मुख्याधिकारी यांच्याशी तब्बल १ तास सविस्तर चर्चा करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी ह्यावेळी केले, ह्यावर सकारात्मक प्रतिसाद देत सर्व विषयांवर लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी सूरज जाधव यांनी ह्यावेळी दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos