गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह ७४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद तर ११४ जण कोरोनामुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  जिल्हयात आज 74 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर आज 114 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6552 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5684 वर पोहचली. तसेच सद्या 803 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 65 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन मृत्यूमध्ये चामोर्शी तालुक्यातील घारगांव येथील 36 वर्षीय महिलाचा समावेश आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.75 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 12.26 टक्के तर मृत्यू दर 0.99 टक्के झाला.
नवीन 74 बाधितांमध्ये गडचिरोली 32, अहेरी 8, आरमोरी 7, भामरागड 3, चामोर्शी 6, धानोरा 1, एटापल्ली 8, कोरची 1, कुरखेडा 5, मुलचेरा 2, व सिरोंचा येथील 1 जणांचा समावेश आहे. 
आज कोरोनामुक्त झालेल्या 114 रूग्णांमध्ये गडचिरोली 36, अहेरी 16, आरमोरी 5, भामरागड 25, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 3, मुलचेरा 1, सिरोंचा 1 कोरची 3,  कुरखेडा 5, व वडसा मधील 15  जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील कन्नमवार वार्ड 3,  आरमोरी रोड 1, सर्वोदय वार्ड 3, रामपुरी वार्ड दुर्गा मंदिरजवळ 5, नवेगाव 3, इंदिरानगर 2, कलेक्टर कॉलनी 3, शाहुनगर 1, गोकुलनगर 2, स्थानिक 3, आयटीआय चौक 2, आशिर्वादनगर 1, रामनगर 1, पोर्ला 1, साईनगर नवेगाव 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 6, आलापल्ली 2, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 5, महागाव 1, देलनवाडी 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3,  चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये अंखोडा 2, स्थानिक 1, विकासपल्ली 2, येनापूर 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये मोहली 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 7, सीआरपीएफ जवान 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये टाकलाभाटी 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये आजादनगर 1, स्थानिक 3, श्रीरामनगर 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये श्रीनगर 1, स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 1 स्थानिकाचा समावेश आहे. 




  Print






News - Gadchiroli | Posted : 2020-11-08






Related Photos