जम्मू-काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये चार जवान शाहिद : तीन दहशतवाद्यांचा खात्मा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलाने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. ऑपरेशन दरम्यान तीन सैनिक आणि एक बीएसएफ जवान शहीद झाला. सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बीएसएफच्या म्हणण्यानुसार कॉन्स्टेबल सुदीप सरकार माछिल सेक्टरमध्ये कारवाई दरम्यान शहीद झाले. दहशतवाद्यांविरूद्धच्या कारवाईत सैन्यही सामील आहे. संयुक्त ऑपरेशन चालू आहे.
सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माछिल सेक्टरमध्ये सुरू असलेल्या कारवाईत लष्करातील एक कॅप्टन आणि दोन सैनिकांचा जीव गेला. तीन दहशतवादी ठार झाले आहेत. ऑपरेशन सुरु आहे.
  Print


News - World | Posted : 2020-11-08


Related Photos