गडचिरोली जिल्ह्यात आज आढळले ७१ नवीन कोरोना बाधित, तर १०९ जण कोरोनामुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :   
कोरोनाचे जिल्हयात 71 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6478 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5570 वर पोहचली. तसेच सद्या 844 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 64 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.98 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 13.03 टक्के तर मृत्यू दर 0.99 टक्के झाला. 
नवीन 71 बाधितांमध्ये गडचिरोली 32, अहेरी 12, आरमोरी 5, भामरागड 0, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली3, कोरची 1, कुरखेडा 3, मुलचेरा 3, सिरोंचा 6 व वडसा येथील 2 जणांचा समावेश आहे. 
आज कोरोनामुक्त झालेल्या 109 रूग्णांमध्ये गडचिरोली 45, अहेरी 10, आरमोरी 4, भामरागड 23, चामोर्शी 6, धानोरा 4, एटापल्ली 3, मुलचेरा 2, सिरोंचा 4 कोरची 0,  कुरखेडा 3, व वडसा मधील 5  जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील कारमेर शाळेजवळ कोऑपरेटीव्ह बँक 1, सर्वोदय वार्ड 2, रेड्डी गोडाऊन 1, कॅम्प एरिया 4, पोलीस स्टेशनच्या मागे 1, नंदनवन नगर चोमोर्शी रोड 1,  रामपुरी वार्ड 1, लांजेडा 1, बट्टुवार कॉम्पलेक्सच्या मागे 1, वाटर टँकजवळ आरमोरी रोड 1, पेालीस कॉलनी 2, कॉम्पलेक्स 1, कन्नमवार वार्ड 2, रेव्हेन्यु कॉलनी 1, श्रीक्रिष्णनगर 2, गोकुलनगर 1, नगरपरिषद जवळ 2, चामोर्शी रोड 1,  बालाजीनगर  चामोर्शी रोड 1, गुजरी रोड सर्वोदय वार्ड 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 4,  आलापल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये वसाला 1, स्थानिक 4, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0,  चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये विक्रमपूर 1, आष्टी 2, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये पोलीस स्टेशन अलदंन्डी 1, तुमरगुंडा 1, इंदिरावार्ड 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये गणेगट्टा 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये कुरंभीटोला 1, स्थानिक 1, सलाईटोला 1,  मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3,  सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, अंकिसा 1, पेंटीपका 1,  जनमपल्ली 1, व वडसा तालुक्यातील बाधीतामध्ये तसेच कोरेगाव 2, दुसऱ्या राज्यातील बाधितामध्ये मुरुमगांव येथील सीआरपीएफ जवान 1, गडचिरेाली येथील सीआरपीएफ जवान 1, अहेरी येथील सीआरपीएफ जवान 7, तसेच इतर जिल्ह्यातील 3 जणाचा समावेश आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-11-07


Related Photos