महत्वाच्या बातम्या

 मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सायबर जागृती शिबीर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महानगरपालिका व चंद्रपूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा महाकाली कॉलरी सेमी इंग्रजी शाळा येथील विद्यार्थ्यांसाठी सायबर जागृती व मोबाईल फोनचा वापर या विषयावर मार्गदर्शन शिबीर २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी चंद्रपूर पोलीस स्टेशनचे PSI चजयराम चव्हाण सर (PSI) व त्यांच्या सहकाऱ्यांनी सायबर क्राईम पासुन कसे सुरक्षित राहावे, मोबाईल किती वेळ वापरावा या विषयी सखोल मार्गदर्शन केले.  

विविध प्रकारचे सायबर गुन्हे कसे घडतात? त्याची माध्यमे कोणती? आपल्या मोबाइलचा उपयोग किती आणि कसा करावा? विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी? याबाबत कोणते कायदे आहेत? तक्रार करताना कोणत्या समस्या निर्माण होतात? तक्रार वेळेत करणे कसे महत्वाचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यासाठी आवश्यक टोल फ्री क्रमांक 112 बाबत माहिती दिली.

फोन ट्रॅकिंग मशीन कशाप्रकारे कार्य करते? त्यात कोणती माहीती मिळते याची माहीती तसेच मोबाईल वापरतांना आपल्या हातातून घडणार्‍या चुका आणि त्यासाठी घ्यायची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी कपूर मेजर, पंडित मेजर, मंगेश मेजर, निलेश मेजर तसेच शरद वासुदेवराव शेंडे (मुख्याध्यापक), भूषण सुरेश बुरटे (सहाय्यक शिक्षक) उपस्थित होते.   





  Print






News - Chandrapur




Related Photos