महत्वाच्या बातम्या

 कृषि संचालकांचा एक दिवस भामरागड तालुक्यातील बळीराजासाठी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरू असून २४ व २५ डिसेंबर रोजी राज्याचे कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) पाटील आणि कृषि संचालक (आत्मा) तांबाडे यांनी अहेरी उपविभागातील भामरागड तालुक्यात भेट देऊन मौजा कोयनगुडा येथे एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. सर्व गावकऱ्यानी आपआपल्या अडचणी मांडल्या आणि या बाबत पाटिल आणि तांबाडे यांनी सकारात्मक उपाय योजना सांगीतले.

तांबाडे यांनी कोयणगुडा गावातील आदिवासी शेतकऱ्यांना पिक विमाचे महत्त्व समजावे, आणि हमखास पुराच्या पाण्यामुळे बुडणाऱ्या क्षेत्राचा विमा दरवर्षी शेतकऱ्यानी काढावे या करीता पुढील खरीप हंगामात सदर क्षेत्राचे विमा रक्कम स्वतः भरण्याचे त्यांनी आश्वासन दिले. रब्बी हंगामामध्ये पिक घेण्यासाठी शेतकऱ्यानी क्लस्टर स्वरुपात सलग क्षेत्रात सामुहिक कुंपन करुन रब्बी पिक घ्यावे असे आवाहन पाटील यांनी केले.

तसेच २५ डिसेंबर २०२२ रोजी मौजा केडमरा येथे पालीकराव बापु आलाम यांच्या राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत हरभरा, करडई, मसुर प्रात्याक्षिकास भेट दिली व हरभरा लागवडीस तुषार सिंचनाची जोड देण्याची सुचना संबंधित कृषि सहाय्यक आणि शेतकऱ्यास केली.

दोन्ही संचालकांनी सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यासोबत संवाद साधुन त्यांना मार्गदर्शन केले तसेच एवढ्या अति दुर्गम अतिनक्षलग्रस्त भागात कृषि विभागाच्या कामा बद्दल कौतुक केले तसेच आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी राज्य स्तरावरुन सर्वातोपरी प्रयत्न करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. या दौऱ्या दरम्यान त्यांचे सोबत उपसंचालक धापटे तालुका कृषि अधिकारी नेटके सर्व कृषि सहाय्यक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos