नगर परिषद नरखेड येथील कनिष्ठ लिपीक २ हजार रूपयांची लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनीधी / नागपूर :
वरिष्ठस्तर वेतनश्रेणीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नागपूर येथून मंजूर करून आणून देण्याकरिता २ हजार रूपयांची लाच स्विकारतांना नगर परिषद नरखेड जि. नागपूर येथील कनिष्ठ लिपीकाला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. मनोहर श्रावण कळंभे (५७) असे लाचखोर कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनूसार तक्रारदार हे नरखेड येथील रहीवासी असून ते नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. २ येथे मुख्याध्यापक आहे. तक्रारदाराने सन २०१६ मध्ये मुख्याधिकारी नगरपरिषद नरखेड ता. नरखेड जि. नागपूर यांना वरिष्ठस्तर वेतनश्रेणी लागे होण्याकरिता विनंती अर्ज केला होता. परंतू अदयापही तक्रारदाराचे वरिष्ठस्तर वेतनश्रेणीचा प्रस्ताव मंजुर झाला नाही तो नगर परिषद नरखेड येथे प्रलंबित होता. सदर प्रस्ताव संबधनाने २६ ऑक्टोबर २०२० रोजी कनिष्ठ श्रेणी लिपीक मनोहर श्रावण कळंभे यांनी तक्रारदार यांच्या मोबाईल फोनव्दारे वरिष्ठस्तर वेनश्रेणीचा प्रस्ताव मंजूर करण्याकरिता ३ हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना कनिष्ठ श्रेणी लिपीक मनोहर श्रावण कळंभे यास लाच रक्कम देण्याची ईच्छा नसगल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे तक्रार दाखल केली.
पोलिस निरीक्षक सारंग मिराशी यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणी दरम्यान कनिष्ठ श्रेणी लिपीक मनोहर श्रावण कळंभे यांनी वरिष्ठस्तर वेतनश्रेणीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नागपूर येथेन मंजूर करून आणून देण्याकरिता ३ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 2 हजार रूपये लाच रक्कम नगर परिषद नरखेड शिक्षण विभाग येथे स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने रंगेहाथ पकडले. मुख्य लिपीक यांच्याविरूध्द पोलिस स्टेशन नरखेड नागपूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधिक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अपर पोलिस अधिक्षक राजेश दुद्दलवार, यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सारंग मिराशी,पोहवा दिनेश शिवले, नापोशि मंगेश कळंबे, पोशि राहुल बारई, चालक पोशि विनोद नायगमकर यांनी केली.
  Print


News - Nagpur | Posted : 2020-10-29


Related Photos