www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट देऊन व्याज परतावा योजनेला क्लिक करा. काही अडचणी उद्भवल्यास जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी 0८३२९९८३८७० या क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या, वर्धा यांनी कळविले आहे.

" /> www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट देऊन व्याज परतावा योजनेला क्लिक करा. काही अडचणी उद्भवल्यास जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी 0८३२९९८३८७० या क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या, वर्धा यांनी कळविले आहे.

"/>
महत्वाच्या बातम्या

 इतर मागासवर्गीयांचे कल्याण, विकास व उन्नतीसाठी शैक्षणिक कर्ज योजना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे कल्याण, विकास व उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्यावतीने शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळामार्फत राबविण्यात येणारी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना बँकेमार्फत राबविण्यात येते. बँक कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा देशांतर्गंत रुपये १० लक्ष व परदेशी उच्च शिक्षणासाठी रुपये २०लक्ष पर्यंत आहे. अर्जदार विद्यार्थ्यांचे वय १७ ते ३० वर्ष असावे, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये ८ लक्ष आहे. तसेच विद्यार्थी १२ वी मध्ये ६० टक्के गुणासह उत्तीर्ण असावा.
देशांतर्गत अभ्यासक्रम आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायीक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रीया व पशुविज्ञान यांचा समावेश आहे. बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क पुस्तके, साहित्य खरेदी, राहण्याचा व भोजनाचा खर्च याचा समावेश राहील.
परदेशी अभ्यासक्रमामध्ये आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायीक व व्यवस्थापन, विज्ञान, कला विषयांचा समावेश आहे. बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क पुस्तके व साहित्य खरेदीचा समावेश राहील.पदरेशी अभ्यासक्रमासाठी परदेशी विद्यापिठाचा रॅकिंग २०० च्या आतील पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर योजनेच्या माहितीकरीता www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट देऊन व्याज परतावा योजनेला क्लिक करा. काही अडचणी उद्भवल्यास जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी 0८३२९९८३८७० या क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या, वर्धा यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos