दारूबंदी उठवून आदिवासींना विकासापासून रोखू नका


- सामाजिक कार्यकर्ते देवाजी पदा यांचे दारूबंदीला समर्थन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हातील दारूबंदी उठवून आदिवासींना दारू पाजून बरबाद करण्याचे हे षढयंत्र आहे. जिल्ह्यातील दारू सुरु करणे म्हणजे आदिवासी समाजाला विकासापासून रोखणे होय. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी न उठविता अधिक मजबूत करावी, अशी मागणी कोंदावाही ग्रामसभेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते देवाजी पदा यांनी केली आहे. तसेच घोडेझरी ग्रामसभेने दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी ठराव घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे. आदिवासी गावांमध्ये संघटना सक्रिय निर्णय घेऊन दारूमुक्त गाव करीत आहेत. दारूविक्री बंद असल्याने गावात शांतता टिकून आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदीला आमचे समर्थन आहे. महाराष्ट्र शासनाने कोणत्याही स्थितीत दारूबंदी उठवू नये, उलट दारूमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती करावी, अशी मागणी ४५ गावे समाविष्ट असलेल्या घोडेझरी ग्रामसभेने केली आहे. दारूबंदी उठवून आदिवासींना विकासापासून रोखू नका. जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा, असे मत सामाजिक कार्यकर्ते देवाजी पदा यांनी मांडले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-10-17


Related Photos