अल्पवयीन मतिमंद व अपंग मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस १५ वर्षे सश्रम कारावास व ६० हजार रूपये दंडाची शिक्षा


- जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एन.मेहरे यांचा न्यायनिर्वाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अल्पवयीन मतिमंद व अपंग मुलीवर बळजबरीने अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश १ आर.एन.मेहरे यांनी आज १६ ऑक्टोबर रोजी १५ वर्षे सश्रम कारावास व ६० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संजय गोवर्धन वाकडे (३२) रा. देलोडा खुर्द ता. आरमोरी जि. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी संजय वाकडे हा २ सप्टेंबर २०१८ रोजी पिडीता घराच्या अंगणात बसली असतांना तिच्या जवळ जावून तिला घरी नेवुन देतो म्हणून उचलुन तिच्या काकाच्या घरी घेवून गेला व पिडीता मतीमंद व अपंग असल्याचा फायदा घेवून तिच्यार बळजबरीने अत्याचार करत असल्याचे पिडीतेच्या आजीने बघितले. पिडीतेच्या आजीने सदर घटना पिडेतेच्या आईस सांगितले असता घटनेची तक्रार पिडीतेच्या आईने पोलिस स्टेशन आरमोरी येथे दिली.  त्यावरून पोलिस स्टेशन आरमोरी येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासात घेतला. गुन्ह्याचा तपास आरमोरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक शितल राणे यांनी पुर्ण करून आरोपीविरूध्द जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली येथे दोषारोपत्र दाखल करून जिल्हा व सत्र न्यायालय १ यांच्या न्यायालयात खटला चालविण्यात आला. न्यायालयाने तक्रारदार व साक्षीदारांचे बयाण नोंदवून आरोपीविरूध्द सबळ पुरावा मिळून आल्याने व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राहय धरून जिल्हा व सत्र न्यायाधिश १ आर.एन.मेहरे यांनी आज १६  ऑक्टोबर रोजी आरोपीस क.३७६  भादवी व ६ पोस्को अंतर्गत १५ वर्षे सश्रम कारावास व ६० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच पिडीतेस ५५ हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहे.
सदर गुन्ह्याचा  तपास आरमोरी पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक शितल राणे  यांनी केला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांनी काम पाहिले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-10-16


Related Photos