ग्रामसेविकासह माजी सरपंचावर एसीबीची कारवाई


- पदाचा गैरवापर करून शासकीय रकमेचा केला अपहार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : पदाचा गैरवापर करून मनरेगा योजनेअंतर्गत मंजुर सिंचन विहिरीच्या कामात गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाल्याने वर्धा जिल्हयातील धामनगाव ग्रामपंचायतचे गा्रमसेविका श्रीमती रूपाली एन. मुजबैले 33 रा. हिंगणघाट जि. वर्धा व तत्कालीन सरपंचा श्रीमती छबुताई बाळबुधे 46 रा वालदुर जि. वर्धा यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत पोलिस स्टेशन हिंगणघाट जि. वर्धा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ग्रामसेविका रूपाली एन. मुजबैले व तत्कालीन सरपंच श्रीमती छबुताई बाळबुधे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीतील आरोपी आक्षेपांची पडताळणी करून गैर अर्जदार यांच्याविरूध्द उघड चैकशी सुरू करण्यात आली. यातील मुळ तक्रारदार हे वालधुर येथील रहिवाासी असुन त्याना शासकी योेजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजुर झाली होती. सदर विहीरीचे बांधकाम पुर्ण झाले नसतांनासुध्दा विहिरीकरीता मंजुर झालेला निधी खर्च झाल्याचे दाखविण्यात आल्याचे तक्रारदार यांनी तक्रार अर्जाव्दारे कळविले होते. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सदर प्रकरणाची उघड चैकशी केली असता, सदर सिंचन विहिरीच्या कामामध्ये कुशल कामावर नोंदविण्यात आलेला खर्च हा प्रत्यक्ष काम न करता व साहित्याची खरेदी न करता तसेच मुल्यांकनाचा आधार न घेता पंचायत समितीकडून कुशल साहित्याची रक्कम 51 हजार 168 रूपये प्राप्त करून त्यापैकी हार्डवेअर दुकानदार हिंगणघाट यांना धनादेशाव्दारे 27 हजार 468 रूपये व ब्लास्टींगकरिता 4 हजार 690 रूपये संबंधित व्यक्तीस अदा करून उर्वरित रक्कम 19 हजार 10 रूपये धामनगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कु. रूपाली नानाजी मुजबैले यांनी गैर कायदेशिर मार्गाने स्वतः कडे ठेवून शासकीय निधीचा अपहार केल्याचे तसेच वालदुर ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच श्रीमती छबुताई बाळबुधे यांनी त्यांना सहकार्य केल्याचे उघड चैकशीवरून दिसुन आल्याने आज 12 आॅक्टोबर रोजी ग्रामसेवीकासह सरपंचावर पोलिस स्टेशन हिंगणघाट जि. वर्धा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधिक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अपर पोलिस अधिक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधिक्षक गजानन विखे, मनापोशि पल्लवी बोबडे, नापोशि अतुल वैद्य, पोशि कैलास वालदे,चापोशि निलेश महाजन यांनी केलीे आहे.
News - Wardha | Posted : 2020-10-12