साखरी घाटावरुन मोठ्या प्रमाणात होत आहे रेती तस्करी


- महसुल विभागाचे दुर्लक्ष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सावली :
तालुका नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला आहे.या परीसरात जंगल,नद्या असे नैसर्गिक नजारा लाभलेला असुन या नैसर्गिक साधन संपत्ती कडे आता तस्कराची नजर लागली आहे. वैनगंगा या नद्यांचे खोरे या तालुक्याला लाभले आहे. या खोर्यात बहुमुल्य अशी वाळु आहे या वाळुवर आता तस्करांची नजर पळली आहे.सावली तालुक्यात वाळुला जास्त भाव मिळत असल्याने येथील अनेकजन हे आता या बहुमुल्य अवैध वाळू चे ठेकेदार झाले आहेत.
सावली तालुक्यातील रेतीघाटाचे लिलाव झालेले नाहीत. बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने, वाढीव दरात रेतीचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे रेतीमाफिया शासनाचे उत्पन्न बुडवत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील साखरी,सामदा व बोरमाळा येथून अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु असते.पावसाळ्यातील दोन महीने सोडले तर वर्षभर ही रेती तस्करी चालूच असते.सध्या साखरी घाट चालू असून या घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु आहे. रेतीतस्करांनी थेट नदीपात्रात, नालापात्रात ट्रॅक्टर उतरविण्यासाठी रस्ते तयार केले आहेत.
तालुक्यातील साखरी या नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन राजरोसपणे सुरु असून कोरोणा काळात प्रशासन व्यस्त असल्याचे फायदा घेत आहेत.
तालुक्यातील रेतीघाटाचे लिलाव झालेले नाहीत. बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने, वाढीव दरात रेतीचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे रेतीमाफिया शासनाचे उत्पन्न बुडवत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील बोरमाळा, सामदा व साखरी येथून अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु असते. रेतीतस्करांनी थेट नदीपात्रात ट्रॅक्टर उतरविण्यासाठी रस्ते तयार केले आहेत.
रेतीमाफिया अवैध रेतीचा साठा करून दामदुप्पट भावात विकत असतात. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी शक्य तेवढ्या उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. सर्व प्रमुख मार्गावरून मनमर्जीने अवैध रेतीचे परिवहन सुरु आहे. अनेक शासकीय कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत आहे.एखाद्या वेळेस अधिकारी येतो आणि लगेच निघुन जातो.त्यामुळे सर्व रेती तस्कर आपली ट्रॅक्टर गावाजवळ लागून ठेवतात.व अधिकारी गेल्यानंतर परत वाहतूक चालू होते. अवैध उत्खनन व वाहतुकीला तहसीलदारांनी आळा घालणे आवश्यक आहे.
ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करून नदीतून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व चोरी सर्रासपणे सुरु आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीने सावली परिसरातील खासगी व शासकीय बांधकामांना सर्रासपणे रेती पुरविली जात असते. 
   परिसरात रेतीमाफियांची मोठी टोळी असून ते प्रशासन व्यस्त असल्याचा फायदा घेत आहेत. साखरी नदि घाटावर रात्रभर विनाक्रमांकाच्या ट्रॉलीसह, ट्रॅक्टरची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
यात सावली तालुक्यातील या रेतीची तस्करी करतात यावर मात्र प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होताना दिसुन येत नाही. रात्रभर हे राजकीय पक्षांचे शिलेदार फिरत असतात कोरोणा महामारीने संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यात हाहाकार माजला आहे पन सावली तालुक्यात मात्र रेती तस्करांना खुली सुट दिली असल्याचे दिसून येत आहे. यावर वेळीच आळा घातला जावा व शासनाच्या करोडो रुपयांचा महसूल वाचविण्यात यावा. अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-10-12


Related Photos