जाफ्राबाद, टेकडा येथील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई, सात जणांवर गुन्हे दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा :
तालुुक्यातील बामणी उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाफ्राबाद, टेकडा येथील अवैध दारू व्यावसायीकांवर कारवाई केली असून सात अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्यासह उपपोलिस ठाणे बामणीचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर घुले व पोलिस पथकाने गावात अवैध दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकली. घरात साठवून ठेवलेला गुळा - मोहाचा सडवा, गावठी दारू बनविण्याचे साहित्य नष्ट केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी गावातील महिला बचत गट, युवकांना मार्गदर्शन करताना युवापिढीने व्यसनाला बळी न पडता अवैध दारू व्यावसायीकांच्या विरोधात एकजुटीने समोर येण्याचे आवाहन केले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-11


Related Photos