ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : अखेर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई
: एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा समाजाच्या नेत्यांकडून वारंवार होत होती. ठाकरे सरकारने अखेर आज मोठा निर्णय घेत राज्य सेवा मंडळाच्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्याद्यांना त्रास होऊ नये यासाठी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली.
एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटेंनी विनायक मेटेंच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारवर टीका झाली. पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे एमपीएससी परीक्षा येत्या ११ ऑक्टोबरला होणार होती. मात्र सध्या राज्यात कोरोनाचा धोका आहे. रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यात अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही समोर आल्या कारणाने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला दिलेली आश्वासने पाळली नाहीत, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असताना मुख्यमंत्र्यांनी काहीही केले नाही. याशिवाय मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर पोलीस भरतीचा निर्णय कसा घेतला, असा सवालही मेटे आणि मराठा आंदोलनातल्या नेत्यांनी उपस्थित केला होता. त्याशिवाय विरोधकांकडूनही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला होता. आता एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने नाराज मराठा समाजाला दिलासा देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-10-09


Related Photos