खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश , रिपल्बिकन वाहिनीचे नाव पुढे


- दोन व्यक्तींना अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
खोट्या टीआरपीसाठी (TRP) रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. पैसे देऊन टिआरपी मिटरशी छेडछाड करण्यात येत होती. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची धक्कादायक माहिती दिली. पैसे देऊन टीआरपीसाठी छेडछाड करण्यात येत होती. याप्रकरणी दोन मराठी चॅनेलचे मालक ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांना अटक करण्यात आले आहे. तसेच खोट्या टीआरपीसाठी रिपब्लिक चॅनेलचे नाव पुढे आले आहे. काही चॅनेल बंद असताना सुरु ठेवण्यात आली. रिपब्लिक प्रमोटर्स जाळ्यात सापडले आहेत. रिपब्लिकच्या खात्यांची चौकशी होणार आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
टीआरपी वाढवण्यासाठी टीआरपी रेटींग कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना लाच दिली, टीआरपी मशिन असलेल्या घरांना पैशांचे आमिष दाखवले, विशिष्ट चॅनेल दिवसभर सुरु ठेवण्यासाठी महिन्याला ४०० ते ५०० रुपये दिले, वाढलेल्या टीआरपीमुळं जास्त दरानं जाहिराती मिळवल्या, महागड्या जाहिरातीतून कोट्यवधींचा अवैध नफा चॅनेल्सनी कमावला. 
गेल्या काही दिवसांपासून आमच्या अनेक केसे संदर्भात आम्ही माहिती दिली होती. खोटी माहिती पसरवली जात होती. सोशलमीडियावर फेक अकाऊंट फॉल्स टीआरपीचा रॅकेट पुढे आले आहे. देशात २००० बॅरोमीटर लावण्यात आले आहे. बॅरोमीटर लावण्याचे आणि दुरुस्तीचे काम हंसा कंपनीकडे  देण्यात आले होते. हंसा कंपनीचे माजी कर्मचारी बॅरोमीटर असणाऱ्या घरांची माहिती पुरवत असे हेच कर्मचारी लोकांना पैसे देऊन काही खास चॅनल लावायला सांगत होते, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.
प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्याच्या खात्यातून २० लाख रुपये मिळाले आहेत, तसेच ८ लाख रुपये जप्त केले आहेत. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या चॅनलच्या मालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. बीएआरसीने दिलेल्या  रिपोर्ट नुसार रिपब्लिक टीव्हीचे प्रमोटर, कर्मचारी यासगळ्यात अडकले असलण्याची शक्यता आहे. जाहिरातींमधून टीव्ही चॅनलचे फंड यातून उघड झाले आहेत.
खोट्या टीआरपीबद्दल रिपल्बिकन वाहिनीचे नाव पुढे आले आहे. टीआरपी रेटिंगमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी हंसा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. टीआरपीसाठी ५०० रुपये महिन्याला देण्यात येत होते. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या प्रमुख तीन चॅनेल आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. तसेच यात आणखी संशयीत असण्याची शक्यता आहे. त्यानुसार तपास करण्यात येणार आहे. व्यक्ती किंवा संस्था कितीही मोठी असो, जर यात त्यांचा सहभाग असेल तर त्यांची चौकशी होऊन कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.
  Print


News - Rajy | Posted : 2020-10-08


Related Photos