महत्वाच्या बातम्या

 अनियमित वाहन नोंदणी प्रकरणात ५ कर्मचाऱ्यांचे विभागीय चौकशी सुरू : माहिती मंत्री शंभूराज देसाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सण २०१७ ते २०२० या कालावधीत शुल्क व कराचा भरणा न करता एकूण ११६ वाहनांची अनियमित नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले, असून ही वाहने संगणक प्रणालीवर ब्लॅक लिस्ट करण्यात आले आहेत. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिले.

विधानसभेत आज सदस्य वैभव नाईक यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून याबाबतचा मुद्दा उपस्थित केले होते. त्यावेळी मंत्री देसाई बोलत होते. त्यांनी सांगितले, की उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सण २०१७ ते २०२० या कालावधीत शुल्क व कराचा भरणा न करता ११६ वाहनांची नोंदणी प्रकरणी परिवहन कार्यालयातील एकूण पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच चार खासगी व्यक्तींच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना आयुक्त, परिवहन यांनी सेवेत पुन:र्स्थापित केले आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भास्करराव जाधव यांनी सहभाग घेतले.





  Print






News - Nagpur




Related Photos