महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी विनय गौडा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात गर्भलिंग परीक्षणास आळा बसावा तसेच स्त्री-पुरुषाचे लिंग गुणोत्तर संतुलित राहण्याच्या दृष्टीने पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात जिल्हा दक्षता पथकाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश्वरी गाडगे, कोरपणा वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायकवाड, डॉ. गजानन मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एखादी व्यक्ती गर्भलिंग निदान करीत असेल तर 1800 233 4475 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी अथवा माहिती द्यावी. जेणेकरून, गर्भलिंग परीक्षणास आळा बसेल. जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रावर टोल-फ्री क्रमांक दर्शविणारे माहिती फलक अथवा पोस्टर लावावेत. तसेच जिल्ह्यात स्त्री-पुरुषाचे लिंग गुणोत्तर संतुलित राहण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.





  Print






News - Chandrapur




Related Photos