महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली शाळेचा विद्यार्थी ओम बोन्द्रे यांनी मिळविले सुवर्ण पदक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे द्वारा क्रीडा स्पर्धा २०२२-२३ आयोजित करण्यात आले. राज्यस्तर शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा ठाणे (मुंबई) २२ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२२ दरम्यान मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत, धम्म सम्राट, अशोक बुध्द विहार, मिरा रोड, जि. ठाणे येथे झालेल्या स्पर्धेत गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली स्कूलचा विद्यार्थी ओम बोन्द्रे याने सुवर्ण पदक घेऊन राष्ट्रीय पातळीवर धडक दिला असून जिल्हाचे नाव लौकिक केला असून ज़िल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos