कुरखेडा - कोरची मार्गावर ट्रॅक्टर ट्रालीवर मोटारसायकल धडकल्याने दोन जण जागीच ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रालीवर मोटारसायकलने  धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे जण  जागीच ठार झाल्याची घटना आज २७ सप्टेंबर रोजी  रात्री ८ वाजताच्या सुमारास कुरखेडा - कोरची महामार्गावर हेटीनगर येथे घडली. 
रामेश्वर जुळा (४०)  व उद्धव सांसुरवार (३५) दोघेही रा.  कन्हारटोला   ता. कुरखेडा अशी मृतकांची नावे आहेत.  
प्राप्त माहितीनुसार दोघेही मृतक  मोटारसायकलने पुराडा वरून आपल्या गावाकडे जात असताना हेटीनगर जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रालीला धडक दिली . याअपघातात दोघेही जण जागीच ठार झाले.  घटनेची माहिती मिळताच पुराडा  पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-09-27


Related Photos