गडचिरोली शहरातील बॅंक ऑफ इंडिया शाखेचा कर्मचारी कोरोना पाॅझिटीव्ह : २२ व २३ सप्टेंबर रोजी बॅंक राहणार बंद


- फलकाद्वारे खातेदारांना दिली सूचना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरातील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतील कर्मचारी आज २१ सप्टेंबर रोजी कोरोना पाॅझिटीव्ह आल्याने बॅंक आज तसेच उदया २२ सप्टेंबर व २३ सप्टेंबर रोजी बंद राहणार असल्याचे कळते आहे. तसा फलकही बॅंकेच्या दारावर लावण्यात आला आहे. जिल्हयासह शहरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच अनेक रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. प्रशासन खबदारीचा उपाय म्हणून सर्वांना मास्क लावणे अनिवार्य केले आहे व योग्य ती स्वतःची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे आहे . तसेच शासनातर्फे 'माझे कुटुंब माझी जबादारी' मोहीम राबविण्यात येेत आहे. तरी सुध्दा दिवसेंदिवस शहरासह जिल्हयात कोरोनाबाधित रूग्ण संख्या वाढत आहे. आज २१ सप्टेंबर रोजी गडचिरोली शहरातील बॅक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्याचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने बॅकेचे दारावर उदया २२ सप्टेंबर व २३ सप्टेंबर रोजी बॅंक बंद राहणार असे फलक लावण्यात आले आहे. सदर बॅंक हि जिल्हयाची मुख्य शाखा आहे, यात अनेकांचे बॅक खाते आहे. कर्मचारी कोरोना पाॅझिटीव्ह निघाल्याने बॅकेचे कामकाज बंद राहणार असल्याने खातेदारांना मात्र याचा फटका बसणार आहे.  
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-09-21


Related Photos