पेटीएम वापरकर्त्यांना मोठा झटका : प्ले स्टोअरवरून पेटीएम अ‍ॅप अचानक झाले गायब


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी पेटीएम आणि पेटीएम फर्स्ट गेम  हे दोन्ही अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे. वन ९७  कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचे हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर दिसत नाही आहे. पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीच्या इतर अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. मात्र Paytm आणि Paytm First Game हे दोन अ‍ॅप काढून टाकण्यात आले आहे.
गुगल प्ले स्टोअरने हे अ‍ॅप जुगारासंबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काढून टाकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुगलनं याआधी ऑनलाइन जुगाराला परवानगी देत नाही किंवा अशा अ‍ॅप्सना समर्थन देत नाही, असे सांगितले होते. त्यानंतर हे दोन्ही अ‍ॅप काढून टाकण्यात आले आहे.
दरम्यान, अद्याप Paytm कडून Google Play Store वरून अ‍ॅप काढून टाकण्याबाबत कोणतेही निवेदन आले नाही आहे. मात्र गूगलचे उपाध्यक्ष सुझान फ्रे यांनी लिहिले आहे की आम्ही ऑनलाइन कसिनोला परवानगी देत ​​नाही किंवा सट्टेबाजीची करणाऱ्या अ‍ॅप्सना मान्यता देत नाही.
  Print


News - World | Posted : 2020-09-18


Related Photos