केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे.
‘काल थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणी दरम्यान माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, असे ट्विट गडकरी यांनी केले आहे. तसेच माझी तब्येत ठीक असून आपल्या सर्वांच्या प्रार्थना माझ्यासोबत असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी, असे आवाहन गडकरी यांनी केले.
दरम्यान, मोदी सरकारमध्ये याआधी अमित शहा, धर्मेंद्र प्रधान यासह अन्य काही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता गडकरी यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गडकरी यांनी स्वतः याबाबत माहिती दिल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ट्विट करून त्यांच्या चांगल्या तब्येतीची कामना केली.
  Print


News - Rajy | Posted : 2020-09-17


Related Photos