लाहेरी मार्गावर दुब्बागुडा ते मलमपोड्डूर दरम्यान नक्षल्यांनी झाडे तोडून अडविला रस्ता, २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान सप्ताह पाळण्याचे पत्रकातून आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी (भामरागड)
: भामरागड तालुक्यातील लाहेरी मार्गावरील दुब्बागुडा ते मलमपोड्डूर दरम्यान नक्षल्यांनी मुख्य मार्गावर झाडे तोडून टाकली असून पत्रके आणि बॅनर बांधले आहेत. यामधून पार्टीचा १६ वा स्थापना वर्ष २१ ते २८ सप्टेंबरपर्यंत क्रांतीकारी सप्ताह पाळण्याचे आवाहन केले आहे.
नक्षली हालचालींना रणनितीच्या दृष्टीने संचालित करा, जनाधार वाढवून जनयुध्द गुरीला युध्द अधिक प्रभावी आणि व्यापक करून समाधान योजनेला हरवा, सामंतवादी आणि साम्राज्यवादी संस्कृतीच्या विरोधात सांस्कृतिक, शैक्षणिक आणि बौध्दीक क्षेत्रांमध्ये आंदोलन करा, अशाप्रकारचे आवाहन नक्षल्यांनी पत्रकातून केले आहे. भामरागड एरीया कमिटी असे पत्रकावर नमुद करण्यात आले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-09-16


Related Photos