आज गडचिरोली जिल्ह्यात ४७ नवीन कोरोनाबाधित , तर २८ जण कोरोनामुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
जिल्ह्यात आज 47 नविन कोरोनाबाधित आढळून आले. तर सक्रिय रुग्णांपैकी 28 जण आज कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय रुग्णांची संख्या 451 झाली. आत्तापर्यत एकूण बाधित 1709 रुग्णांपैकी 1251 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 7 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
 आज नविन 47 बाधितांमध्ये गडचिरोली शहरातील 25 जणांचा समावेश आहे. यात शाहूनगर पोटेगाव रोड 3, संविधान चौक 1, पोस्ट ऑफिस 2, कारमेल शाळेच्या मागे 1, कलेक्टर कॉलनी 1, अयोध्यानगर 2, मथुरा नगर 1, वार्ड नंबर 18 शिवाजीनगर 1, हनुमान वार्ड 1, पेट्रोलपंप नवेगाव जवळ 1, आर्या शोरुम जवळ 1, गोविंदपूर 1, सोनापूर कॉम्प्लेक्स 1, इतर जिल्हयातील यात सिंदेवाही 5 व ब्रम्हपूरी 1 व इतर 2 यांचा समावेश आहे. वडसा येथील सीआरपीएफ 3, हनुमान वार्ड 1, राजेंद्रवार्ड 3 , अशा 10 जणांचा समावेश आहे. 
 चामोर्शी 5 यात पेटातळा 1, चंद्रपूरला ॲडमिट असलेला 1 जण , खाटी मोहल्ला 3 यांचा समावेश आहे. धानोरा येथे 3 जण यात खूटगावचे 3 आहेत . आरमोरी 2 यात शंकरापूर, चिमूरचा 1 जण , आझाद चौक 1 जण जो नागपूरला ॲडमिट आहे. अहेरीचे 2 यात आलापल्ली 1 व अहेरी 1 जण आहे. असे आज 47 बाधित आढळले .  आज 28 कोरोनामुक्त रुग्णांमध्ये गडचिरोली 8, चामोर्शी 8 , कोरची 5 , वडसा 4, अहेरी 3 जणांचा समावेश आहे. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-09-15


Related Photos