महत्वाच्या बातम्या

 सांघिक विजेतेपद महिलांच्या गटात सरदार पटेल महाविद्यालयाने मारली बाजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. ६,७ आणि ८ ऑक्टोबर अशा तीन दिवसांमध्ये महिलांची व्हॉलीबॉल  स्पर्धा पार पडली . यामध्ये सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरने प्रथम क्रमांक पटकावलाय. द्वितीय लोकमान्य महाविद्यालय, वरोरा तर जे.एस.पी. एम महाविद्यालय धानोरा तृतीय स्थानी राहिला. स्पर्धेचे प्रमुख डॉ. आनंद वानखेडे तर संघ निवडीची जबाबदारी डॉ. खान, डॉ.मुरलीधर रूखमोडे, डॉ. आनंद वानखेडे यांनी पार पडली.

आज स्विमिंगची स्पर्धा पार पडली. १०,११ आणि १२ ऑक्टोबर असे तीन दिवस खो- खो ची स्पर्धा चालणार आहे तर उद्या बॅडमिंटनची स्पर्धा सुरू होणार आहे. संचालक शारीरिक व क्रीडा विभाग डॉ. अनिता लोखंडे यांच्या मार्गदर्शनात या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा सुरू आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos