मूल येथील मुद्रांक विक्रीचा काळाबाजार थांबवा


-  अधिकच्या पैशाची करण्यात येते मागणी, नागरिकांमध्ये रोष, जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मूल :
शैक्षणिक कामे असो की शे​तीविषयक अथवा जमिनीच्या खरेदी-विक्रीचे काम असो,  मुद्रांक पेपर घेणे गरजेचे आहे. मात्र १०० रूपयांच्या मुद्रांक पेपरमागे अधिकचे १० ते २० रूपये सर्वसामान्यांकडून घेत असल्याने मुद्रांक विक्रीचा हा काळाबाजार तत्काळ थांबविण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केल्या जात आहे.
मूल तालुक्यातील तहसील कार्यालयातून मुद्रांक विक्रेत्यांकडून मुद्रांक पेपरची दररोज मोठया प्रमाणात उचल होत असते. सध्या शेतीसाठी कर्ज उचल, शैक्षणिक कामासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना मुद्रांकाची गरज भासते. नेमका याच संधीचा फायदा घेत येथील मुद्रांक विक्रेते एका मुद्रांकपेपरमागे १० ते २० रूपये अधिकचे घेत असून सर्वसामान्य नागरिकांची लूट करीत असल्याचे चित्र आहे.
याबाबत विचारणा केली असता मुद्रांक देण्यास टाळाटाळ केल्या जाते. नाईलाजास्तव अधिकचे पैसे देऊन मुद्रांक पेपर घ्यावा लागतो. याबाबतची सत्यता उघड करण्यासाठी  तहसील कार्यालयाकडे फेरफटका मारला असता एका मुद्रांक विक्रेत्याला १०० रूपयांचा मुद्रांक मा​गितला. मात्र तो मुद्रांक त्यांना ११० रूपयाला घ्यावा लागता. हा प्रकार चुकीचा असल्याचे मुद्रांक विक्रेत्याला सांगितले. 
मात्र मुद्रांक विक्रेत्याने उध्दट बोलून उलट माझे काहीही वाकडे होवू शकत नाही असे म्हणून हकलून लावले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आर्शिवार्दानेच हा प्रकार सुरू असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होती. याकडे लक्ष देत तत्काळ हा काळाबाजार थांबविण्यासाठी मागणी संतप्त नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-09-14


Related Photos