रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याप्रकरणी शवागारातील २ कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिके केले निलंबित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
मुंबई महानगरपालिकेच्या शीव इथल्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याप्रकरणी शवागारातील २ कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे. तर या प्रकरणाची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर अशा चुकांचे  महानगरपालिका मुळीच समर्थन करणार नसून या दुर्दैवी प्रकारात दोषी आढळल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. तर, मृत व्यक्तिचं शवविच्छेदन करताना मूत्रपिंड (किडनी) काढण्यात आल्याच्या आरोप चुकीचा असल्याचेही पालिकेने  म्हटले आहे.
सायन इथल्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अंकुश सुरवडे (२६) यांना २८ ऑगस्ट २०२० रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले  होते. एका अपघातात जबर जखमी झाल्याने अंकुश सुरवडे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. पण दुर्दैवाने अंकुश यांचे  काल सकाळी निधन झाले. यानंतर विहित प्रक्रियेनुसार त्यांचे शव उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले.
दरम्यान, सायन रुग्णालयातच हेमंत दिगंबर यांना शनिवार १२  सप्टेंबर २०२० रोजी मृतावस्थेतच त्यांच्या नातेवाईकांनी आणले होते. अंकुश व हेमंत या दोन्ही रुग्णांच्या शवांची उत्तरीय तपासणी काल सकाळी करण्यात आली. त्यानंतर दोन्ही शव रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते. अंकुश सुरवडे यांच्या नातेवाईकांनी काल सकाळीच रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून दुपारी ४ वाजेच्या सुमारास येऊन ते अंकुश यांचा शव ताब्यात घेतील असे कळवले  होते.
  Print


News - Rajy | Posted : 2020-09-14


Related Photos