मूल येथील राईस मिल चालकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मूल :
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक समोरील गोयल यांच्या मालकीच्या आदर्श राईस मिलमध्ये चालक म्हणून काम करणाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली.
अक्षय दयानंद सोनुले (३२)  रा.चिचाळा हेटी  असे  मृतक चालकाचे नाव आहे. राईस मील परिसरात अक्षयला विजेचा धक्का लागल्याची चर्चा आहे. अक्षय हा खाली कोसळताच त्याला तातडीने उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखला केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल असे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले.
मृत्यकाच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगी व मुलगा आहे. कुटुंबाच्या त​क्रारीवरून पोलिसांनी भादंवि 174 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-09-09


Related Photos