वर्धा येथील कामगार अधिकारी व वाहन चालकावर एसीबीची कारवाई : ३० हजार रूपयांची स्वीकारली लाच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा :
शिष्यवृत्ती मंजुर करूण देण्याकरीता ३० हजार रूपयांची लाच स्विकारल्याने कामगार कार्यालय वर्धा येथील कामगार अधिकारी पवनकुमार धर्मा चव्हाण (३३) व कंत्राटी वाहन चालक पवन बालचंद्र अंबादे (३०) यांना लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगहाथ पकडले आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे अंबुलकर ले आउट वरूड पोस्ट सेवाग्राम जि. वर्धा येथील रहीवासी असुन ते ईमारत बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे. तक्रारदाराचा मुलगा अमरावती येथे बीटे मध्ये शिक्षण घेत असुन मुलगी हे बारावी मध्ये वर्धा येथे शिक्षण घेत आहे. दोन्ही मुलांना शिष्यवृत्ती मिळण्याकरीता तक्रारदाराने कामगार कार्यालय वर्धा येथे अर्ज केला होता. सदर अर्जावर काय कारवाई झाली त्याकरिता तक्रारदार हे कामगार कार्यालय वर्धा येथे जावून सरकारी कामगार अधिकारी, पवनकुमार धर्मा चव्हाण यांना भेटले असता त्यांनी तक्रारदारास दोन्ही मुलांचे शिष्यवृत्ती मंजुर करून देण्याकरिता ३० हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना पवनकुमार धर्मा चव्हाण यास लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली.
पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये 8 सप्टेंबर रोजी पडताळणी दरम्यान सरकारी कामगार अधिकारी पवनकुमार धर्मा चव्हाण यांनी तक्रारदाराचे दोन्ही मुलांचे शिष्यवृत्ती करून देण्याकरिता 30 हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम पवन बालचंद्र अंबादे याच्याहस्ते कामगार कार्यालय वर्धा येथे स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने रंगेहात पकडले. सरकारी कामगार अधिकारी व कंत्राटी वाहन चालक यांच्याविरूध्द पोलिस स्टेशन रामनगर वर्धा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरद कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधिक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अपर पोलिस अधिक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीचक दिनेश लबडे, अशोक बैस, श्रिकांत गोतमारे, शालीनी जांभुळकर, नरेंद्र चैधरी, योगेंद्र चैधरी, चालक पोहवा राजेश बन्सोडे लाचलुपत प्रतिबंधक विभाग नागपूर हे करित आहेत.
  Print


News - Wardha | Posted : 2020-09-09


Related Photos