गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रयत्नाने पुराडा आरोग्य पथकाला मिळाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रयत्नाने व सततच्या पाठपुराव्याने गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथील प्राथमिक आरोग्य पथकाचे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये श्रेणीवर्धन झाले आहे. यासंदर्भात आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांचे ३ सप्टेंबर २०२० ला आदेश प्राप्त झाले आहे. या आदेशामुळे पुराडा परिसरातील लोकांना आता आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे लोकांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. अजय कंकडालवार हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना पुराडा येथील प्राथमिक आरोग्य पथकाचे श्रेणीवर्धन करण्याची मागणी करून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. दरम्यान ३ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयान्वये पुराडा येथील प्राथमिक आरोग्य पथकाचे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुराडा येथील प्राथमिक आरोग्य पथकाची मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे निवासस्थानाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने सदर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता पदनिर्मिती करण्याबात कार्यवाही करण्यात येणार आहे. विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पुराडा येथील आरोग्य पथकाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळाला असल्याने त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. त्याबद्दल पुराडा परिसरातील नागरिकांकडून शासन, प्रशासन व जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-09-04


Related Photos