महत्वाच्या बातम्या

 खेळाडूंनी जिद्द व चिकाटीने स्पर्धेत यशस्वी व्हावे : खासदार अशोक नेते


- इंदिरानगर येथे रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : क्रिकेट हा खेळ सांघिक कामगिरीचा खेळ असून संपूर्ण संघाचे योगदान स्पर्धा जिंकण्यासाठी लागत असते. प्रत्येकाला आपापल्या परीने फलंदाजी व गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयी करण्याचा प्रयत्न करावा लागतो.  खेळाडूंनी आत्मविश्वासाने तसेच जिद्द व चिकाटीने खेळ खेळून स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करावा व स्पर्धेत यशस्वी व्हावे. प्रत्येक खेळाडूने शांतचित्ताने व खेळाडू वृत्तीने खेळ खेळून स्पर्धेमध्ये विजयी होण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले. काल २४ डिसेंबर रोजी गडचिरोली चषक २०२२ रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी खेळाडूंना व नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता उरकुडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर कुमरे, स्पर्धेचे प्रायोजक रवी फोटो स्टुडिओ चे संचालक रवि मेश्राम, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, क्रिकेट समालोचक सतीश त्रीनगरीवार, पत्रकार रुपराज वाकोडे, विलास नैताम, स्पर्धेचे आयोजक अनुराग पिपरे तसेच इंदिरानगर वार्डातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रदेश सदस्य रमेश भुरसे व प्रमोद पिपरे यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळेस सर्वप्रथम क्रिकेटच्या मैदानावर विधिवत पूजा करून फीत कापून क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर खासदार अशोक नेते व जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी बॅट हातात घेऊन चौफेर फटकेबाजी करीत क्रिकेटचा आस्वाद घेतला. त्यांनंतर दोन संघादरम्यान क्रिकेटचा सामना सुरू करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रूपराज वाकोडे व सतीश त्रीनगरीवार यांनी केले.






  Print






News - Gadchiroli




Related Photos