गडचिरोलीचा राहूल पेंढारकर घेतोय निशुल्क 'बाल आनंद शिबिर'


- मुलांवर गीरवतोय संस्काराचे धडे , चंद्रपूर जिल्ह्यातही शिबिराला सुरुवात करणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
विदर्भाच्या अतीपुर्वेला नक्षलजिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल अहेरी तालुक्यातील लोक वन मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. कोरोना आला आणि त्यांच्या हातावरचा पोट मेला. धरमपूर येथे जिल्हा प्राथमिक शाळा आहे पण लॉकडाऊन मधे शाळा बंद पडली. पण मुलांचा जिव काही खेळावाचून करमेना. मुले रोज सायंकाळी एकत्र खेळताना दिसायची. यातुनच मुलांसाठी 'बाल आनंद शिबिर' घेण्याची कल्पना आली.
आपल्याकडे ‘संकटाला संधी’ म्हणायची पद्धत आहे. तसे मानून काम करायचंच झाल्यास शिक्षणात कालसुसंगत असे सर्वांगीण बदल करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असे म्हणून सुरुवात केली. शिबिरासाठी पालकांची परवानगी घेतली. सर्वांगिण विकास बहूद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळच्या सहकार्याने आणि जागृत युवा मंचच्या वतीने शारिरीक अंतर ठेवून आणि माक्सचा वापर करून पाच दिवशिय 'बाल आनंद शिबिर' सुरु केलं. सोबतच प्रा. डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांच मार्गदर्शन, सारिका उराडे आणि टिना उराडे यांची साथ होतीच. 

शिबिराचा पहिला दिवस-
शिबिरार्थ्यानी परिसर स्वच्छता केली, self introduction ची नवी पद्धत शिकली, 'कबड्डी' खेळतांना  मुलींनी कब्बड्डी बघण्याचा मनमुराद आनंद लुटला, पण जरा वेळाने मुली सुद्धा कबड्डी सारख्या मर्दानी खेळात उतरल्या. 

शिबिराचा दुसरा दिवस-
शिबिराच्या पहिल्या दिवशी मुलांनी मनमुराद आनंद लुटला, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली. चित्रकला स्पर्धेचा 'निसर्ग' हा विषय होता. मुलांनी कल्पना करून खूप सुंदर-सुंदर चित्र काढली. त्यामुळे सर्वांनाच 'पहिला नंबर' दयावा लागला. त्यातच चॉकलेटची भर पडली. Games, sports मधे चांगला response मिळाला. feedback मधे मुलं म्हणालीत की, ''रोज न चुकता येऊ'' 

शिबिराचा तिसरा दिवस-
पाऊस येत होता. वाटलं मुलं येणार नाहीत. पण  मुलांची गर्दी पटांगणावर न जमता थेट माझ्या घरी जमली. मग काय, माझ्या घरच्या पोर्च मधे बसून आम्ही शिबिर सुरु केलं. निबंधाचा विषय होता 'शाळा सुरु झाली तर...?' मुलांनी कल्पना करून लिहिण्यास कुठलिच कसरत सोडली नाही. त्यानंतर भूगोलाचा अभ्यास करून चंद्र- ताऱ्याशी मैत्री केली. 'microscope' (सूक्ष्मदर्शिका) बद्दल माहिती जाणून घेता आली. येवढंच नाही, तर त्याचा उपयोग का? , कशासाठी ? आणि कसा करायचा ह्याबद्दल मुलांना प्रयोगातून जाणून घेता आले..

शिबिराचा चौथा दिवस-
शिबिरार्थ्यानी 'कथाकथन' उपक्रमात सहभाग घेतला. मुळात 'कथाकथन' ही 'स्पर्धा' नाही. गोष्टींच्या माध्यमातून बोध घेऊन मुलांना स्वतःचे वागणे, बोलले, समाजात वावरणे या सर्वांवर नियंत्रण कसे मिळवता येईल ? कुणाचे वाईट चिंतन करू नये, सहयोग भावना निर्माण करावी याबद्दल शिकता आले.

शिबिराचा पाचवा दिवस- 
शिबिराचा शेवटचा दिवस म्हणून मुलांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. यातून मूलभूत, काही साध्या गोष्टी शिकवित्या आल्या. 
स्वावलंबन - स्वयंपाक करणे, भांडी धुणे, स्वतःचं काम स्वतः करणे.ह्याचे चार उद्देश आहेत -
१) गरीबी - दररोज इतकी भांडी सलग 30 दिवस धुतल्यावर एखाद्याला 700 -800 रुपये महिन्याला मिळतात हे समजावे. जेणेकरून पैसे खर्च करताना आपण किती काळजी घ्यायला हवी याची जाणीव व्हावी.
२) भांडी धुतल्यावर उठताना कंबर आणि पाठ कशी भरून येते याचा अनुभव घेतल्यावर घरातील महिलांच्या कष्टांची किंमत कळावी.
३) कुठलेही काम कमीपणाचे नाही हे समजावे.
४) अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा दंभ, 
अहंकार न व्हावा. मुलांना परत काही किरकोळ पण महत्वाच्या गोष्टी शिकवता आल्या. भाजी, टमाटे कापण्यापूर्वी नीट धुवून घ्यावी. जेवतांना हात आणि ताट धुवून घ्यावे. टायर गेम- ह्यात स्पर्धा असते. स्पर्धेत दोन गट सहभागी असतात. म्हणून जिंकण्याकरिता एकमेकांचे सहकार्य महत्वाचे असते. यातून सहकार्याची भावना जागृत होते. शेवटचा दिवस असल्याने मुलांनी खूप एंजॉय केलं. येवढ्या दिवसात कुणी कुणाचं नकळत मन दुखावलं असेलच त्यामुळे 'सॉरी, थँक्स आणि परत भेटुयाट' असं म्हणता आलं.
            
पु. ल. म्हणतात की, 'आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.' मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी नव्या पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी १२ गुणांच्या संवर्धनाचा आराखडा मांडला. ते १२ गुण आहेत: १. परीक्षा यश २. चांगले शरीर ३. क्रीडा कौशल्य ४. कलानैपुण्य ५. देशप्रेम / मानवताप्रेम ६. कृतज्ञताबुध्दी ७. चांगले वागणे ८. दूरदृष्टी ९. व्यवहार १०. शांतीप्रेम ११. निर्भयता १२. नेतृत्व. या 12 गोष्टी मला पाच दिवशिय 'बाल आनंद शिबिरा'तुन शिकविता आल्या. मुलांच्या बाबतित बोलायचं झाल्यास तोच जुनाट अभ्यासक्रम, तीच पाठय़पुस्तकं आणि त्याच साचेबद्ध परीक्षा.असं झाल्यास आपण आपली आणि मुलांचीही घोर फसवणूक केल्यासारखं होईल. सार्वजनिक आरोग्याबरोबर शिक्षणव्यवस्थेत मूलभूत बदल करणं गरजेचं आहे. 


स्टेटमेंट-
कपडे वितरण असो की मुलांचे school bag, स्वेटर्स, ब्लण्केट्स, सायकल, रेनकोट वाटप, गरजूंना मदत अशी कामे मी अनेक वर्षापासून जागृत युवा मंचच्या माध्यमातून करत आलेलो आहे. 'बाल आनंद शिबिरा'ला लागणारा खर्च मी स्वतः केलेला आहे. मुलांना कलर बॉक्स, ड्रॉईंग शीट, चॉकलेटस, जेवणाची व्यवस्था, प्रमाणपत्र या साऱ्या गोष्टीसाठी मला शासनाकडून रक्कम मिळत नाही. एखाद वेळेस स्वेच्छेने मदत करणारे लोक पुढे येतात. पण ऐन वेळेस खर्च स्वतःच पूरवावा लागत असतो. 'बाल संस्कार शिबिरा'चा हा आमचा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला. त्यामुळं आता चंद्रपूर जिल्ह्यात देखील लवकरच निशुल्क 'बाल आनंद शिबिरा'ला सुरुवात करणार आहोत.

- राहूल पेंढारकर, संस्थापक अध्यक्ष, जागृत युवा मंच.
मो. 7057606384




  Print






News - Gadchiroli | Posted : 2020-08-31






Related Photos