शासकीय रकमेच्या अपहार प्रकरणातील आरोपीतांकडून तपासादरम्यान १ किलो १६० ग्रॅम सोने जप्त


- मोठा गुन्हा उघड करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश, पुन्हा दोन आरोपी जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जलसंधारण विभागातील शासकीय रकमेचा अपहार प्रकरण संबंधाने, बनावट स्वाक्षऱ्या व कार्यालयील शिक्के मारून आरटीजीएस संबंधात पत्र तसेच बनावट धनादेशाव्दारे ६ कोटी २२ लाख ५९ हजार ३५१ रूपये रकमेपैकी २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रूपये खात्यातून काढून आरटीजीएस च्या माध्यमाने रामदुत कन्स्ट्रक्शन कंपनी, निर्वाना बिल्डर्स, चिरंजिवी टेªडलींक, उत्कर्ष निर्माण कंपनी, पवनसूत कन्स्ट्रक्शन कंपनी इत्यादी बॅक खात्यांमध्ये वळती करून ३ जून २०१९ ते १२ जून २०१९ दरम्यान केला असल्याबाबत लेखी तक्रारीवरून पोलिस स्टेशन गडचिरोली येथे १९ सप्टेंबर २०१९ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हाचा तपास पोलिस अधिक्षक शेैलेश बलकवडे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली करीत आहे.
पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वात अपर पोलिस अधिक्षक डाॅ. मोहीतकुमार गर्ग यांनी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेवून गुन्हयाचे तपासा संदर्भात मार्गदर्शन केले. पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हयातील आरोपीतांच्या अटक प्रक्रियेसंबंधाने ६ वेगवेगळे स्वतंत्र पोलिस पथक तयार करून यातील सक्रीय आरोपी स्नेहदिप श्रीराम सोनी (४७) रा. नंदनवन केडीके काॅलेज नागपूर, किशोरीलाल हिरालाल डहरवाल (५१) रा. रेडडी ता. कुरई जि. शिवनी, सुदिप श्रीराम सोनी (५१) रा. नाईक रोड, महाल नागपूर, अमित मनोहर अग्नीहोत्री (३५), रा. धनगवळी नगर हुडकेश्वर नागपूर, अतुल देवीदास डुकरे (४२) रा. प्लाट क्र. ६६ अशिर्वाद नगर नागपूर, विनोद मंगलसिंग प्रधान (४७) रा. करडी ता. मोहाडी जि. भंडारा यांना ५ ऑगस्ट रोजी ताब्यात घेवून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने गुन्हयाची व्यापकता व गांभीर्य लक्षात घेवून आरोपीतांचा १४  दिवसांचा पोलिस कोठी रिमांड मंजूर केला होता. तपासादरम्यान आरोपीतांनी दिलेल्या कबुलीवरून त्यांनी अपहारित रकमेतून वेगवेळया ठिकाणी खरेदी केेलेल्या स्थावर मालमत्ता संबंधातील दस्तऐवज तसेच तांत्रिक पुरावे हस्तगत करून त्यांची पडताळणी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे.
आरोपीतांनी खरेदी केलेल्या मालमत्ता या अपहारित रकमेतून खरेदी केलेल्या आहेत तसेच गुल्हयातील मुख्य सुत्रधार स्नेहदिप उर्फ बंटी श्रीराम सोनी रा. नागपूर याने जिल्हा परिषद भंडारा व गडचिरोली येथील अपहारित रकमेतून मोठया प्रमाणात सोने खरेदी केल असल्याची  कबुली  दिल्याने त्यांचे राहते घरून तसचे बॅकेच्या लाॅकर मधून १  किलो 160 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले. सदयाचे बाजारभावाप्रमाणे जप्त सोन्याची किंमत ६०,००००० रूपये एवढी आहे. तर सदर गुन्हयातील तपासादरम्यान काल १८ ऑगस्ट रोजी पुन्हा दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुधाकर गोपीचंद कांबळे (३८)रा. रामकृष्णनगर दिघोरी नागपूर, संजय ज्ञानेश्वर दळवी (४८) रा. जलालपूरा शारदा चैक गांधीबाग नागपूर  यांना न्यायालयाने ७ दिवासांची पोलिस कोठडी मंजूर केलीे आहे. सदर गुन्हयातील आरोपीतांनी जिल्हा परिषद भंडारा येथील जवळपास ६ करोडा रूपयांचा शासकीय मालमत्तेचा अपहार केला असल्याची कबुली दिली आहे. नमुद गुन्हयात सक्रीय असलेल्या अरोपींची नावे निष्पन्न् करण्यात आली असून त्यांचा गुन्हातील सहभाग व भुमिका स्पष्ट करून त्यांना अटक करण्याची तजबीज ठेवली आहे.
पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी संपूर्ण तपास पथकाचे कौतूक व अभिंनदन करीत अपर पोलिस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकार तथा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि उल्हास भुसारी व त्यांच्या संपूर्ण टिमने गुन्हा दाखल झाल्यापासून तो उघडकीस आणण्याकरीता घेतलेली मेहनत, तांत्रीक पुरावा जमा करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच गडचिरोली पोलिस दलाला आरोपी गजाआड करण्यात यश प्राप्त झाले असल्याचे सांगितले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-08-19


Related Photos