गडचिरोली येथे सर्पमित्रांनी दिले दहा फुट लांबीच्या अजगर सापास जीवदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / गडचिरोली
: शहरातील काॅम्प्लेस परिसरात काल ५ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास आढळून आलेल्या दहा फुट लांबीच्या अजगर सापास गडचिरोली येथील सर्पमित्रांनी पकडून जीवदान दिले आहे.
काॅम्प्लेक्स परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचारी निवासस्थान परिसरात अजगर साप असल्याची माहिती तेथील उपस्थितांनी सर्पमित्र अजय कुकडकर यांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दैवत बोदेले, श्रीकांत कुळमेथे यांनी घटनास्थळ गाठले. सापाला पकडून वनपरीक्षेत्र अधिकारी डी.व्ही. कैलुके यांना माहिती दिली. सापाला वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आले. यानंतर आज ६ आॅक्टोबर रोजी सापाला चांदाळा मार्गावरील जंगलात सुरक्षितरित्या सोडून देण्यात आले. यावेळी सर्पमित्र अजय कुकडकर, पंकज फरकडे, मकसूद सैय्यद, श्रीकांत नैताम, महेश निलेकार, होमदेव कुरवटकर, वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-06


Related Photos