महत्वाच्या बातम्या

 सम्मेद शिखर तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करण्यास जैन समाजाचा विरोध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : जैन समाजाचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ बनवण्याचा विरोध सकल जैन समाजाने केला आहे. पर्यटन स्थळ व्हावे असा प्रस्ताव झारखंड सरकार यांनी केंद्र सरकारकडे पाठविल्याने येथील सकल जैन समाजाच्या वतीने बुधवार 21 डिसेंबर रोजी सरकार विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.

वरोरा येथील जैन मंदिरात दर्शन घेऊन जैन समाजाच्या शेकडो महिला पुरुषांनी अहिंसेचा मार्ग अवलंबत झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजीला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यास विरोध केला आहे. या विरोधात आज तहसीलदार वरोरा यांचे मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना केंद्र सरकारला हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. झारखंडमधील जैन समाजाचे प्रसिद्ध आणि प्रमुख तीर्थक्षेत्र समेद शिखर यांचा देशातील पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश करण्याला देशभरातील जैन समाजाकडून विरोध केला जात आहे. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देतांना प्रणेश मालू अध्यक्ष, दिवेश चोरड़िया सचिव, धीरज सिपानी उपाध्यक्ष, दीपक चोरड़िया कोषाध्यक्ष, भाविक मालू सदस्य, कुशल मालू सदस्य, सिद्धार्थ दुग्गड़ सदस्य, मानकचंद मालू, प्रमोद बोरा, मिश्रीजी कोटकर, सपना मालू, सरिता बोरा, संगीता दुइतकर व शेकडो जैन बंधू भगिनी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos