महत्वाच्या बातम्या

 पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पंडीत दिनदयाल रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेले आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये नवकीसान बायोप्लॅनटेक लिमीटेड नागपूर, डिस्टील एज्युकेशन & टेक्नॉलाजी प्रा. लि. नागपूर, मंगल फायनान्स गडचिरोली, रुचा / बडवे इजिनीअरीग औरंगाबाद, एस बी आय लाईफ इन्सुरन्स गडचिरोली, एल. आय. सी. गडचिरोली,क्वीज कॉर्प लिमिटेड पुणे, इनोव्हसोर्स नागपुर व इतर कंपन्या उपस्थित असणार असून‍ सदर रोजगार मेळाव्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने १४ ऑक्टोबर  २०२२ रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयास संपर्क साधावा.  दुरध्वनी क्रं. ०७१३२-२२२३६८ हा आहे. असे आवाहन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने केले आहे





  Print






News - Gadchiroli




Related Photos